esakal | दूध संघाची लढाई जिंकली, आता कारखान्यासाठी फाईट - लंके

बोलून बातमी शोधा

Now the battle for the sugar factory}

तालुका दूध संघाच्या दूधसंकलनाचा प्रारंभ संघाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन व दूधउत्पादकांचा मेळावा नुकताच सुपे येथे झाला.

ahmednagar
दूध संघाची लढाई जिंकली, आता कारखान्यासाठी फाईट - लंके
sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः ""पारनेर तालुका दूध संघाची लढाई आम्ही आता जिंकली आहे. आता दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका दूध संघ तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा सुरू करीत आहोत. आम्ही एक लढाई जिंकली, आता पुढची लढाई तालुक्‍याची कामधेनू असलेला पारनेर तालुका सहकारी कारखाना पुन्हा शेतकऱ्यांना परत मिळविण्यासाठीची असेल,'' असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. 

तालुका दूध संघाच्या दूधसंकलनाचा प्रारंभ संघाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन व दूधउत्पादकांचा मेळावा नुकताच सुपे येथे झाला. त्या वेळी आमदार लंके बोलत होते.

अध्यक्षस्थानी संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक मोहनराव करंजेकर होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, अशोक सावंत, सुरेश थोरात, सहायक निबंधक अनिल भांगर, दूध संघाचे अध्यक्ष दादासाहेब पठारे, संभाजी रोहकले, सुरेश थोरात, सरपंच सचिन पठारे, वसंत सालके, राजू शेख, सचिन काळे, किरण पवार, उत्तम गवळी, अक्षय थोरात, भाऊसाहेब भोगाडे, दौलतराव गांगड, शरद पवार, गणेश शेळके आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

""दूधउत्पादकांच्या हितासाठी संघ सुरू करत आहोत. त्यास दूधउत्पादक व दूधसंकलन करणाऱ्या संस्थांनी मदत करावी. आता ही लढाई जिंकली आहे. पुढची लढाई शेतकऱ्यांची कामधेनू पारनेर सहकारी कारखाना पुन्हा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी असेल. एके काळी नावलौकिक असलेल्या संघाला गतवैभव प्राप्त करून द्यावे,'' असेही त्यांनी या वेळी सांगितले.