esakal | आता पुढची विकेट काँग्रेस मंत्र्याची, सुजय विखे पाटलांच्या विधानाने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Now the next resignation will be given by the Congress minister

नगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा थांबावा, या मागणीसाठी मी येत्या तीन ते चार दिवसात जिल्हाधिकारी यांना पुराव्यानिशी निवेदन देणारा आहे.

आता पुढची विकेट काँग्रेस मंत्र्याची, सुजय विखे पाटलांच्या विधानाने खळबळ

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर  ः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने भाजपचे पदाधिकारी आणखीच आक्रमक झाले आहेत. पुढचा नंबर कोणाचा, नेक्स्ट टार्गेट कोण, पुढची विकेट पडणार अशा प्रकारच्या टिपण्णी केल्या जात आहेत. नगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी कालपासून आरोपांचा धडाका लावला आहे. पुढचा मंत्री काँग्रेसचा, असा त्यांचा दावा आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वसुली मंत्रीच पुढचे टार्गेट असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

याचिकाच दाखल करतो

नगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा थांबावा, या मागणीसाठी मी येत्या तीन ते चार दिवसात जिल्हाधिकारी यांना पुराव्यानिशी निवेदन देणारा आहे. त्यांनी जर त्या नंतर संबधीतांवर कारवाई केली नाही तर मी 10 दिवसांनतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे व त्याच वेळी मी या बाबत रिटपिटीशन दाखल करणार आहे, असा इशारा खासदार सुजय विखे यांनी पारनेर येथे पत्रकारांशी बोलताना दिलाय. 

कोपरगाव-श्रीगोंदा-पारनेरचे लोकप्रतिनिधीच तस्कर

जिल्ह्यात सर्वाधिक अवैध वाळू उपसा सुरू आहे. कोपरगाव पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील लोकप्रतिनिधी  एकमेकांच्या विरोधातील आहेत.  मात्र, आता  एकत्र येऊन व संगमनेरचा वाटा घेऊन हे लोकप्रतिनिधी वाळू तस्करी करीत आहेत. मी बुधवारी किंवा गुरूवारी पुराव्यानिशी लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना देणार आहे. त्या नंतर 10 दिवसात जर वाळू उपसा बंद झाला नाही, तर मी उपोषणास बसणार आहे. आम्ही अनिल देशमुखांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे मागत होतो, आता न्यायालयाने तो मागितला व तो त्यांना द्यावा लागला.

विकेट नक्की पडणार

पहिल्यांदा शिवसेनेचा मंत्री गेले, आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री व पुढचा नंबर काँग्रेसच्या मंत्र्यांचा आहे. ही राजीनाम्याची साखळी अशीच सुरू राहणार आहे. कोणी पैसे खाल्ले, कोणाकडून खाल्ले, किती वाळू उपसली जाते. कोण कोणाला संरक्षण देतं, याचं सगळं घबाड माझ्याकडे आहे. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर देणारच आहे. पण संसदेत आणि विधिमंडळातही यावर आवाज उठविणार आहे. त्यानंतर दिसेल कोणाची विकेट पडते ते. यात आमच्यासोबत कोणी पूर्वी काम केलेले असतील त्यांनाही सोडणार नाही.

महसूलमंत्रीच जबाबदार

वाळू तस्कारांना महसूल प्रशासनाचा आशीर्वाद आहे. वाळू उपशाचे पुरावे व निवेदन  जिल्हाधिकारी, आयुक्त महसुल सचिव व महसूल मंत्र्यांना देणार आहे. होणाऱ्या परिणामास या सर्वस्वी संबंधित अधिकारी व मंत्रीच जबाबदार असतील. वाळूविरोधातील लढा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. विखे पाटलांच्या आंंदोलनात नेमके कोण टार्गेट होतेय, हे त्यांनी सांगताही लोकांना कळले आहे.

loading image