लंके म्हणतात, आता पारनेरचा विकास कोणी रोखणार नाही

सनी सोनावळे
Sunday, 18 October 2020

सरपंच राहुल झावरे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीची सविस्तर माहिती दिली. रेडझोन उठविण्यासाठी 23 गावांतील ग्रामपंचायतींचे पुन्हा ठराव गोळा करून ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली लढा देणार असल्याचे सांगितले. 

टाकळी ढोकेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामे मंजुर करताना अडचणी येतात मात्र विविध योजनेतुन मतदारसंघाकरीता कोट्यावधी रूपयांचा निधी आणला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकार्यातून के. के. रेंज बाधीत 23 गावांवरील असणारे रेड झोनचे भुत कायमस्वरुपी उतरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले.

वनकुटे(ता.पारनेर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार लंके यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे,अशोक सावंत, सभापती प्रशांत गायकवाड,सुदाम पवार,ऍड राहुल झावरे, 
विक्रम कळमकर,अण्णा सोडणार उपस्थित होते. 

सरपंच राहुल झावरे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीची सविस्तर माहिती दिली. रेडझोन उठविण्यासाठी 23 गावांतील ग्रामपंचायतींचे पुन्हा ठराव गोळा करून ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली लढा देणार असल्याचे सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now no one will stop Parner's development