नगरमध्ये बाधितांचे प्रमाण घटले, दिवसभरात साडेचारशे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

आज जिल्ह्यातील 416 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

नगर ः कोरोनाने नगर शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून बाधित होण्याचे प्रमाण घटले आहे. हजाराचा आकडा आता पाचशेच्याही आत आला आहे.

जिल्ह्यात आज दिवसभरात 452 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 47 हजार 309 झाली. त्यातील 42 हजार 880 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात 3688 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने, मृतांची संख्या 741वर गेली आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. दिवसभरात 416 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 90.64 आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालात 75 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 20, कर्जत एक, कोपरगाव तीन, नगर ग्रामीण सहा, नेवासे पाच, पारनेर चार, पाथर्डी सहा, राहाता एक, राहुरी पाच, संगमनेर पाच, श्रीगोंदे चार, मिलिटरी हॉस्पिटलमधील 20 रुग्ण आढळून आले. 

खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 71 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 20, अकोले दोन, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण सहा, नेवासे तीन, पारनेर दोन, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण सहा, नेवासे तीन, पारनेर दोन, पाथर्डी दोन, राहाता 15, राहुरी 13, संगमनेर एक, श्रीरामपूरमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत 306 बाधित आढळून आले. त्यात महापालिका हद्दीत 15, अकोले 13, जामखेड 36, कर्जत 22, कोपरगाव 13, नगर ग्रामीण सात, नेवासे नऊ, पारनेर 14, पाथर्डी 31, राहाता 50, राहुरी नऊ, संगमनेर 29, शेवगाव 25, श्रीगोंदे 21, श्रीरामपूर अकरा, कॅन्टोन्मेंमटमधील एकाचा समावेश आहे. 

दरम्यान, आज जिल्ह्यातील 416 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यात महापालिका हद्दीतून 31, अकोले 51, जामखेड 35, कर्जत 34, कोपरगाव 13, नगर ग्रामीण एक, नेवासे 37, पारनेर 41, पाथर्डी 17, राहाता 34, राहुरी 32, संगमनेर 31, शेवगाव 26, श्रीगोंदे 14, श्रीरामपूर 17, कॅन्टोन्मेंट दोन रुग्णांचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients decreased in Ahmednagar