नगरमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांचा साडेसहाशेचा लॉट

corona
corona

नगर : जिल्ह्यात बुधवारी ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.६७ टक्के इतकी आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४०८ इतकी झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण २२, श्रीरामपुर ०१, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा १३, पारनेर १२, राहुरी ०१, शेवगाव ०१, कोपरगाव ०५, जामखेड ०१, मिलिटरी हॉस्पीटल ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २४९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर ३१, राहाता २४, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ०३, श्रीरामपुर १०, कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ०६, श्रीगोंदा १५, पारनेर १०, अकोले ०६, राहुरी १३, शेवगाव ३३,  कोपरगाव १५, जामखेड २२ आणि कर्जत ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २३३, संगमनेर ०८, राहाता ०२, नगर ग्रामीण १२, श्रीरामपुर ०३, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा ०२, पारनेर ०२, अकोले ०३, राहुरी ०४, शेवगाव ०२, जामखेड ०७ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा १८५, संगमनेर २२, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर ३७ , कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर १८, अकोले ०६, राहुरी ०४, शेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ०३, कर्जत १७ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेले एकूण रुग्ण : ७७४१

उपचार सुरू असलेले रूग्ण : ३४०८

मृत्यू : १२४

एकूण रूग्ण संख्या : ११२७३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com