कोरोनाने कर्जतमध्ये गाठली शंभरी...मृतांचाही आकडा वाढतोय

corona
corona
Updated on

कर्जत (नगर) : कर्जत शहरासह तालुक्यात कोरोना संसर्ग फोफावत असून रुग्णांनी शंभरी गाठली आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. सध्या तालुक्यात  एकूण 101 रुग्ण असून त्यापैकी 8 जणांना मृत्यूने कवटाळले आहे. ही बाब कर्जतकरांच्या काळजाचा ठोका वाढविणारी आणि जीव टांगणीला लावणारी आहे. तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी युद्धपातळीवर सगळे प्रयत्न करीत असताना नेमके चुकतं कुठंय हा प्रश्न निश्चितीच उपस्थित होत असून शेजारील जामखेड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना ते आटोक्यात आणण्यासाठी रोहित पवार पॅटर्न, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सर्वांना विश्वासात घेत राबविलेली यंत्रणाने जामखेडची गाडी सुरळीत रुळावर आणली. मात्र कर्जत येथे हा पॅटर्न अयशस्वी होत आहे, अशी जनतेत चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यात, राज्यात, देशात, जगात सगळीकडे कोरोना महामारीने उच्छाद मांडलेला असताना देखील कित्येक दिवस कर्जत शहरासह तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला नव्हता. त्याला रोखण्यात प्रशासकीय यंत्रणा यशस्वी ठरली होती. त्याला नागरिक भीतीपोटी प्रतिसाद देत होते. तालुक्यात नियमित लॉकडाऊन झाले. त्यामध्ये थोडीफार शिथिलता येताच राशीन येथून तालुक्यात गनिमी काव्याने कोरोनाचा प्रवेश झाला, मात्र याला कर्जत शहरासह मिरजगाव, माहिजळगाव, कुळ धरण, चापडगाव ही मोठी महसुली गावे मात्र त्याला अपवाद होती. राशीन येथे वृद्ध आजीबाई आणि तीच्या नातीला सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला. सहावर्षीय नातीने कोरोनावर मात केली. मात्र दुर्दैवाने आजींचा मृत्यू झाला. नंतर सिद्धटेक, पाटेगाव, जळगाव (माही) असे रुग्ण वाढत चालले.

त्या नंतर रथ यात्रेसाठी संभाव्य होणारी गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस लॉकडाऊन घेण्यात आले. दरम्यान शहरात रुग्ण आढळल्याने पुन्हा तीन दिवस रुग्ण आढळले. तरी दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आ. रोहित पवार यांनी प्रशासकीय अधिकारी, व्यापारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत पुढे शहरात सात दिवस पुन्हा कडक लॉकडाऊन घ्यायचे निश्चित केले आणि प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

दरम्यान शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचे निधन झाले. शहरात आठ कन्टेन्टमेंट झोन उभारण्यात आले. त्यानंतर दोनच दिवसात पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आणि शहरातील रुग्णांची संख्या वाढून एका प्रथितयश व्यापाऱ्यांच्या वयस्कर वडिलांचे निधन झाले. तसेच मिरजगाव येथे रुग्ण आढळल्याने तेथेही सात दिवस लॉकडाऊन करण्यात आले. कर्जत शहर 29 तारखेपासून पूर्ववत सुरू झाले. मात्र प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या काही कमी होईना. हे असेच चालले तर येत्या काही दिवसात रुग्णाची शंभरी गाठण्याची शक्यता आहे. यासाठी याहीपेक्षा अजून कडक आणि कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची आता नागरिकांतून मागणी होत आहे.

कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे म्हणाल्या, शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे हे चिंताजनक आहे. मात्र बाधित रुग्ण वाढल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने टेस्ट घेऊन पुढील दुर्घटना टाळायची आहे. सध्या रॅपिड टेस्टिंग सुरू असून लक्षणे आढळल्यास निर्भयपणे तपासणीसाठी पुढे यावे. जामखेड आटोक्यात आले त्यावेळी नुकतीच सुरुवात होती, मोठं मनुष्यबळ आणि यंत्रणा होती. आता जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र तालुक्यात साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कर्जतयेथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव म्हणाले, कोरोना हे जागतिक संकट आहे. मात्र नागरिकांनी घाबरू नये. मात्र विनाकारण, विना मास्क फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही. तसा आढळल्यास दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येईल. 

कर्जतयेथील तहसीलदार नानासाहेब आगळे म्हणाले, इतर तालुक्याच्या तुलनेत कर्जतमध्ये प्रमाण कमी असले तरी चिंताजनक आहे. यासाठी युद्धपातळीवर प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. मात्र पुढील अनर्थ टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कन्टेन्टमेंट झोनमधून बाहेर पडू नये. तसेच लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
 
तालुक्यातील कोरोना बाबत सद्यस्थिती :
तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह -101
कर्जत शहरात--9
ग्रामीण भागात-92
बरे झालेले रुग्ण-26
मयत झालेले रुग्ण-8
कॉन्टेमेंट झोन-93
शहरात-8
ग्रामीण भागात-85

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com