esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नगरची वाताहत

बोलून बातमी शोधा

The number of corona patients is increasing rapidly

जिल्ह्यात काल (सोमवारी) एक हजार 100 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 92 हजार 148 झाली आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नगरची वाताहत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमुळे नगर जिल्ह्याची वाताहत होऊ पाहत आहे. दिवसेंदिवस वाढणारी रूग्णसंख्या, सुविधांच्या अभावामुळे लोकांवर नवीनच आफत आली आहे. जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. काल जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 1842 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता दहा हजार 106 झाली आहे. 

जिल्ह्यात काल (सोमवारी) एक हजार 100 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 92 हजार 148 झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत 672, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 580 व अँटीजेन चाचणीत 590 रुग्ण बाधित आढळले. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये बाधित आढळून आलेल्यांत नगर शहरातील 321, अकोले 65, जामखेड 21, कर्जत 13, कोपरगाव 58, नगर ग्रामीण 38, नेवासे 5, पारनेर 18, पाथर्डी 5, राहता 10, राहुरी 3, संगमनेर 66, शेवगाव 1, श्रीरामपूर 26, भिंगार मधील 18 तर मिलिटरी हॉस्पिटल 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.