esakal | श्रीरामपुरातही कोरोनाचे झाले दीड शतक

बोलून बातमी शोधा

The number of corona patients in Shrirampur is also one and a half hundred

शहरातील प्रभाग एकमध्ये 15, प्रभाग दोन परिसरात 13, प्रभाग सात येथे 15, असे एकूण 89 रुग्ण कोरोना रुग्ण आढळले.

श्रीरामपुरातही कोरोनाचे झाले दीड शतक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः शहर परिसरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागात आज दिवसभरात 150 कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले. तसेच उपचारानंतर 78 रुग्णांना घरी सोडण्यात आले. दोन दिवसांपूर्वी 193 कोरोना रुग्ण आढळले होते. काल (ता.5) 105 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 

काल रुग्ण संख्या वाढून तब्बल 150 रुग्ण नव्याने कोरोनाबाधित आढळले. बेलापूर परिसरात पाच, टाकळीभान व उंदीरगाव येथे प्रत्येकी सात, मुठेवाडगाव येथे चार, शिरसगाव व मालुंजा परिसरात प्रत्येकी तीन, बाधित आढळून आले.

शहरातील प्रभाग एकमध्ये 15, प्रभाग दोन परिसरात 13, प्रभाग सात येथे 15, असे एकूण 89 रुग्ण कोरोना रुग्ण आढळले. इतर ठिकाणचे पाच रुग्णही बाधित आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

मागील काही दिवसांत तालुक्‍यातील कोरोना संसर्गाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. शिरसगाव ग्रामीण रुग्णालय व डॉ. आंबेडकर वसतिगृहासह व शहरातील चार खासगी कोविड रुग्णालयांत बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.