अँटीजेन चाचणीत आज 419 जण बाधित आढळुन आलेल्यांमध्ये नगर शहरातील 17, संगमनेर 79, राहाता 27, पाथर्डी 48, नगर ग्रामीण सहा, श्रीरामपूर 21, भिंगार सहा, नेवासे सहा, श्रीगोंदे 22, पारनेर 19, अकोले 41, राहुरी 18, शेवगाव 12, कोपरगाव 28, जामखेड 30 तर कर्जतमधील 39 अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर : जिल्ह्यात आज 875 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35 हजार 644 इतकी झाली आहे.
काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 790 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4341 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाने 665 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 148, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 223 आणि अँटीजेन चाचणीत 419 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरात 70, संगमनेर तीन, पाथर्डी चार, नगर ग्रामीण नऊ, श्रीरामपूर दोन, नेवासे 12, अकोले 17, राहुरी एक, शेवगाव तीन, कोपरगाव सहा, कर्जत पाच, मिलिटरी हॉस्पिटल 15 तर इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 223 रुग्णांपैकी नगर शहरातील 77, संगमनेर 16, राहाता 15, पाथर्डी एक, नगर ग्रामीण 26, श्रीरामपूर 18, नेवासे 15, श्रीगोंदे तीन, पारनेर 18, अकोले दोन, राहुरी 19, शेवगाव दोन, कोपरगाव एक, जामखेड सहा तर कर्जतमधील चार रुग्णांचा समावेश आहे.