रेकॉर्ड ब्रेक; 428 रुग्णांची भर... नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 2620 वर
नगर : जिल्ह्यात कोरोना मीटरला भलताच वेग आला आहे. आज दिवसभरात आणखी 428 रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 2620वर पोचली आहे.
जिल्हा रुग्णालयातील 84, अँटिजेन चाचणीत 44, खासगी प्रयोगशाळेतील 300, असे गेल्या 24 तासांत 428 कोरोनाबाधित आढळून आले. जिल्हा रुग्णालयातील अहवालानुसार, संगमनेर 25, नगर तालुका 22, श्रीगोंदे 15, नगर शहर 13, श्रीरामपूर तीन, अकोले, कर्जतला प्रत्येकी दोन, पारनेर, राहुरीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नगर शहरात स्टेशन रस्ता, सावेडी, सारडा गल्ली, केडगाव, पंचपीर चावडी, सिद्धार्थनगर आदी ठिकाणी कोरोनाबाधित आढळून आले. शिवाय, संगमनेर येथे तब्बल 25 पॉझिटिव्ह आढळले. त्यांत नगर रस्ता, मालदाड रस्ता, रायते, निमगाव जाळी, नांदूर दुमाला, पिंपळगाव देपा, शिबलापूर, घासबाजार, बाजारपेठ, घुलेवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे.
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर, ब्राह्मण गल्ली (भिंगार), नागरदेवळे, टाकळी खातगाव येथेही बाधित आढळले. कात्रड (राहुरी), श्रीरामपूर, पाडळी दर्या (पारनेर), देवदैठण (श्रीगोंदे), हिंगेवाडी, बेलवंडी, काष्टी, चिकलठाणवाडी, निमगाव खलू, येथेही कोरोनाबाधित सापडले. निंबोडी, कोळवडी (कर्जत), तसेच अकोले शहरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. अँटिजेन चाचणीत आज 44 बाधित आढळले. त्यांत संगमनेर 21, नेवासे सहा, राहाता पाच, भिंगार (नगर) चार, श्रीरामपूर तीन, कोपरगाव दोन, तसेच नगरमधील तिघांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेतील चाचण्यांतून 300 रुग्ण आढळले. सध्या 1281 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा 48वर पोचला आहे.
आणखी 58 जणांना डिस्चार्ज
कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज जिल्ह्यातील तब्बल 58 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांत संगमनेर 16, पाथर्डी 14, नगर तालुका, श्रीगोंदे प्रत्येकी सहा, नगर शहर, भिंगार प्रत्येकी पाच, जामखेड तीन, श्रीरामपूर दोन, तसेच राहाता तालुक्यातील एकाचा समावेश आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता 1291वर गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.