दिलासादायक! अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येने ओलांडला एक हजारांचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

नगर : जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांच्या अडकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार २५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी आठ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे.

आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एक रुग्ण तर श्रीगोंदा तालुक्यातील चाडगाव एक, कोळगाव एक, अजनुज एक, देवदैठण एक आणि घारगाव येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. आज सकाळी ७५ रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधित आढळलेल्या रुग्णासह उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ इतकी झाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of patients recovered from corona in Ahmednagar district is 1027