
या सर्वांना जिल्हाध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली.
नगर : नगर शहर ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या केडगाव उपनगराच्या विभागप्रमुखपदी किशोर रोकडे, सावेडी उपनगराच्या विभागप्रमुखपदी संजय सैंदर, बबन कुसाळकर, तर भिंगारच्या विभागप्रमुखपदी नाना आहिरे यांची निवड झाली.
शहराध्यक्ष अनिल इवळे यांच्या सहीने या सर्वांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पत्रांचे वितरण झाले.
पाइपलाइन रस्त्यावरील हॉटेल सागरसमोरील माऊली इस्टेट एजन्सीच्या दालनात कार्यक्रम झाला. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळण्यात आले. केडगाव उपनगराच्या विभागप्रमुखपदी किशोर रोकडे, सावेडी उपनगराच्या विभागप्रमुखपदी संजय सैंदर, बबन कुसाळकर, तर भिंगारच्या विभागप्रमुखपदी नाना आहिरे यांची निवड झाली.
या सर्वांना जिल्हाध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली. विजय काळे, शहर उपाध्यक्ष श्याम औटी, जिल्हा उपाध्यक्ष संदीप घुले, संतोष भालेराव, बाळासाहेब पालवे, आदिनाथ गायकवाड, मल्हारी गिते, सचिव मनोज खोडे, विनायक पालवे, योगेश पिंपळे, मन्सूर सय्यद, मकरंद घोडके, प्रसाद शिंदे उपस्थित होते.