
अंदोलनाला भटक्या विमुक्तचे आनंदा साळवे, बेलदार कुमावत समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे, दलित संघटनेचे राम भारस्कर, सुरेश खैरनार पाठींबा दिला. 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाला केवळ 17 टक्के आरक्षण मिळते. त्यात केवळ 12 टक्के जागा भरल्या गेल्या. हा ओबीसींवरील अन्याय आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : लोकसंख्येत 52 टक्के असलेल्या ओबीसींना केवळ 17 टक्के आरक्षण मिळते. ओबीसीमध्ये ४०० हून अधिक जाती आहेत. मिळालेले आरक्षण अपुरे असल्याने ओबीसींवर अन्याय होतो. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतू ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी येथील ओबीसी समाजबांधवानी केली आहे.
येथील तहसील कार्यालयासमोर ओबीसी संघटनांनी आंदोलन केले. या संदर्भात नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय जगताप, शिंपी समाज संघटनेचे विजय शिंपी, सुवर्णकार समाजाचे सुरेश मैड, तेली समाजाचे राजेंद्र शिंदे, समता परिषदेचे चंद्रकांत झुरंगे, माळी समाजाचे दत्तात्रय साबळे यांनी तहसिलदार प्रशांत पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
अंदोलनाला भटक्या विमुक्तचे आनंदा साळवे, बेलदार कुमावत समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे, दलित संघटनेचे राम भारस्कर, सुरेश खैरनार पाठींबा दिला. 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाला केवळ 17 टक्के आरक्षण मिळते. त्यात केवळ 12 टक्के जागा भरल्या गेल्या. हा ओबीसींवरील अन्याय आहे. मराठा समाजाच्या आरक्षणास ओबीसींचा विरोध नसून सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याची ओबीसींच्या विविध संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले