त्या लोकांना बाजूला ठेवलं तरच निघोज ग्रामपंचायत बिनविरोध, महिलांची भूमिका

अनिल चौधरी
Wednesday, 23 December 2020

गावची निवडणुक बिनविरोध होत असेल तर आम्हाला आनंदच होईल. मात्र यासाठी दारुबंदीला विरोध करणार्यांना आम्ही धडा शिकवणार आहे असा इशारा दारुबंदी चळवळीच्या प्रमुख कार्यकर्त्या कांता लंके यांनी दिला आहे.

निघोज - पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक दारुबंदीला लेखी विरोध करणाऱ्या त्या सात जणांना या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधसाठी उमेदवारीची संधी देवु नका अन्यथा आम्हाला महिलासह दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेवुन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल.

गावची निवडणुक बिनविरोध होत असेल तर आम्हाला आनंदच होईल. मात्र यासाठी दारुबंदीला विरोध करणार्यांना आम्ही धडा शिकवणार आहे असा इशारा दारुबंदी चळवळीच्या प्रमुख कार्यकर्त्या कांता लंके यांनी दिला आहे.

ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा अन् गावाला पंचवीस लाखांचा निधी घ्या .असे जाहीर करुन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलाअसुन निघोजच्या पुढार्यांनीही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सहमती दर्शविली असताना दारुबंदीचा विषय सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे.

आमदार निलेश लंके यांनी निघोजची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी उचलले पाऊल योग्य आहे. त्याच्या बिनविरोध निवडणुकीला आमचा पांठिबा आहे. मात्र दारुबंदी हटविण्यासाठी गावातील ज्या सात जणांनी लेखी पुढाकार घेतला अशा सात जणांना बिनविरोध निवडुन देवु नका. अशी भुमिका आता या महीलांनी घेतली आहे.

या सात जणांनापैकी कोणालाही बिनविरोध निवडणुकीत सामील केले तर आम्ही निवडणुक लढवु. असा इशारा देत आमदार निलेश लंके यांनीच यातुन मार्ग काढावा असे दारुबंदी चळवळीच्या महीला आघाडीच्या प्रमुख कांता लंके यांनी सांगितले आहे.

दरम्यान दारुबंदी चळवळीतील महीलांनी नेमके कोणत्या सात जणांना विरोध केला. हे सात जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? निवडणुक बिनविरोध होणार का?याबाबत पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obstacles of women to make Nighoj Gram Panchayat unopposed