esakal | नगरमधील ओढे, नाल्यांचा श्वास गुदमरला 
sakal

बोलून बातमी शोधा

Odeh in Ahmednagar, the nallas suffocated

नगरमध्ये अनेक ठिकणच्या ओढे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बुजवून तर काही ठिकाणी लहान बंद पाईप टाकुन त्यावर घरे, बंगले, अपार्टमेंट बांधलेले आहेत.

नगरमधील ओढे, नाल्यांचा श्वास गुदमरला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : शहरातील नैसर्गिकपणे वाहत असलेल्या ओढ्या, नाल्यांवर अतिक्रमण करुन बुजविले गेल्याने ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या ओढ्या नाल्याभोवतीच्या रहिवास्यांना ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पर्यावरणाचीही हानी होते. म्हणून हे नदी व नाले मोकळे करण्यात यावेत. प्लास्टिक वापरावरील बंदी कठोर करावी, अशी मागणी हरियाली संस्थेने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, नगरमध्ये अनेक ठिकणच्या ओढे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बुजवून तर काही ठिकाणी लहान बंद पाईप टाकुन त्यावर घरे, बंगले, अपार्टमेंट बांधलेले आहेत. प्लास्टिक अडकल्याने दरवर्षी पावसाळ्यात पाऊस झाल्यानंतर पाणी तुंबल्याने या प्रहावाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात व परिसरात पाणी शिरणे, रस्ता बंद होणे, बाजूच्या गटारीत पाणी घुसल्याने दुर्गंधी निर्माण होणे, अश्‍या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. 

हे ओढे, नाले हळू हळू पूर्णपणे बुजविले गेले तर पाण्याचे मूळ नैसर्गिक प्रवाह खंडीत होऊन भविष्यात गंभीर व अतिगंभीर नैसर्गिक आपत्ती उद्भभवू शकतात. या आपत्तीत मोठ्या हानीचीही शक्‍यता नाकारुन चालणार नाही. म्हणून नगरमधील नागापूर, बोल्हेगाव, निर्मलनगर, सावेडी परिसरातील नरहरी नगर, रासने नगर, भुतकरवाडी, सिव्हील हडको, तारकपूर, सुडके मळा, आर.टी.ओ.ऑफीस, वारुळाचा मारुती, भिंगारनाला, विनायक नगर, रेल्वेस्टेशन भागातील खोकर नाला, केडगाव आदी ठिकणचे 21 पेक्षा जास्त लहान मोठे नदी, ओढेनाले असून यावर कमी अधिक प्रमाणात झालेले अतिक्रमण काढुन मूळ नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरळीत करुन या ओढ्यांचा श्वास मोकळा करण्याची मागणी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे हरियाली संस्थेने केली आहे. निवेदनावर हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, ठाकुरदास परदेशी, रंगनाथ सुंबे, योगेश गायकवाड, विष्णू नेटके, संदीप पावसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.