सावकाराविरूद्ध कारवाईसाठी लाच मागिणारा अधिकारी अटकेत

संजय आ. काटे
Tuesday, 6 October 2020

पंचासमक्ष दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली, असा आरोप ठेवून लाच लुचपत विभागाने श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद देत आरोपी शिवरकर याला ताब्यात घेतले.

श्रीगोंदे : तालुक्यातील एका गावातील सावकारविरुद्ध सहायक निंबधक कार्यालयात तक्रार दिली होती. मात्र, सदर सावकाराविरुद्ध कारवाई करण्यासाठी येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी, श्रेणी 1 ( वर्ग -3) बापुसाहेब खंडेराव शिवरकर ( वय 48 ) यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले.

पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम पवरे यांच्या पथकाने ही कारवाई आज केली. यातील तक्रारदार यांनी एका सावकाराविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून त्या सावकारा विरुध्द कारवाईसाठी लागणारे खर्चाचे ना‌वाखाली आरोपी लोकसेवक हे लाचेची मागणी करत असल्या बाबत दिलेल्या तक्रारीवरून 29 सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली, असा आरोप ठेवून लाच लुचपत विभागाने श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद देत आरोपी शिवरकर याला ताब्यात घेतले. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officer arrested for soliciting bribe for action against moneylender