Walls spray paintersSakal
अहिल्यानगर
Walls spray painters : कार्यालये अस्वच्छतेच्या विळख्यात; भिंती गुटख्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या
Sangamner News : कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशस्त व भव्य-दिव्य शासकीय कार्यालयांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, याच इमारतींमधील स्वच्छतागृह व भिंती गुटखा व तंबाखू खाऊन थुंकल्याने चांगल्याच रंगलेल्या असून दुर्गंधी पसरली आहे.
-राजू नरवडे
संगमनेर : संगमनेर शहरासह घुलेवाडी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून काही वर्षांपूर्वी प्रशस्त व भव्य दिव्य अशा इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, आज या इमारतींच्या भिंती आणि कोपरे तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. यामुळे अनेक जण नाके मुरडताना दिसत आहेत.

