esakal | जुन्या टीव्हीची किंमत लाखोंच्या घरात! अनेकजण शोधताय ‘तो’ टीव्ही; पुणे मार्गे मुंबई कनेक्‍शन
sakal

बोलून बातमी शोधा

Older black and white TVs are in high demand

पंचवीस वर्षांपूर्वी गावोगाव दुर्मिळ असणाऱ्या लाकडी कपाटाच्या टीव्हीची बाजारात किरकोळ किमत होती.

जुन्या टीव्हीची किंमत लाखोंच्या घरात! अनेकजण शोधताय ‘तो’ टीव्ही; पुणे मार्गे मुंबई कनेक्‍शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : पंचवीस वर्षांपूर्वी गावोगाव दुर्मिळ असणाऱ्या लाकडी कपाटाच्या टीव्हीची बाजारात किरकोळ किमत होती. मात्र, त्याच टीव्हीला आता सोन्याचे मोल आले आहे. पुणे- मुंबईतील काही लोक शहरासह गावोगाव आता त्या जुन्या टीव्हीचा शोध घेऊ लागले आहेत. त्याची किमतही ते एक कोटी रुपये सांगत आहेत. त्यामुळे त्या टीव्हीचा कशासाठी वापर होतोय, हे शोधणे गरजेचे आहे. 

ग्रामीण भागासह शहरी भागात पंचवीस वर्षांपूर्वी दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहण्यासाठी साधा लाकडी कपाटासारख्या टीव्हीचा वापर होत होता. त्यात गावातील एखाद्या व्यक्तीच्या घरीच तो टीव्ही असायचा. सायंकाळी टीव्ही पाहण्यासाठी संपूर्ण गाव गोळा होत होता. अनेक गावात ग्रामपंचायतीने टीव्ही खरेदी केले होते. दररोज सायंकाळी बातम्यांसाठी टीव्ही लावला जात होता. कालांतराने नवीन तंत्रज्ञान आले आणि टीव्ही बदलत गेले. आज सर्वत्र एलएडी पहावयास मिळातात. अनेक नागरिकांकडे जुने टीव्ही घरात पडून आहेत. त्याच टीव्हीला आता सोन्याचा भाव आला आहे. 

शहरातील काही लोक गावाकडे संपर्क करून जुना कपाटावाला टीव्ही आहे का? अशी विचारणा करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकही हैराण झाले असून, हा टीव्ही नेमका कशाला हवा आहे, याचा शोध आता काही लोक घेऊ लागले आहेत. त्या टीव्हीतील दोन वस्तू अशा आहेत की त्याची बाजार कोट्यवधीची किंमत आहे, अशी कुजबुज सुरू आहे. मात्र, त्या दोन वस्तूपासून काय तयार होते याची कोणालाच कल्पना नाही. सध्या ग्रामीण भागातील काही तरुण ह्या जुन्या टीव्हीचा शोध घेत असल्याची चर्चा सुरू आहे. 

मुंबईत मास्टर माइंड 
लाकडी कपाटाचे जुने टीव्ही खरेदी करून ते मुंबई येथे विक्री केले जातात. त्यातील लाल रंगाच्या दोन कीट काढून घेतल्या जातात. जुने टीव्ही खरेदी करणाऱ्या टीमचा मास्टर माईंड मुंबईत असल्याची चर्चा आहेत. मुंबईतूनच सर्व सुत्रे हालतात, अशी माहिती समजते. 

त्या कीटमध्ये घातक रसायन 
टीव्हीमधील त्या लाल रंगाच्या कीटमध्ये काहीतरी घातक रसायन असावे. त्याचा वापर स्फोटके बनविण्यासाठी होत असावा, असा अंदाज काहींनी वर्तविला आहे. त्यामुळे जुन्या टीव्ही नेमक्‍या कोण खरेदी करतय आणि त्याचा वापर कशासाठी होतोय, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

त्या वस्तूला परदेशात मागणी 
टीव्हीमधील त्या दोन वस्तूला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आज काही लोक जुना टीव्ही शोधून त्यातील त्या दोन वस्तू काढून घेत आहेत. त्या वस्तू लाखो रुपयांना विकले जात आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर