
बारडगाव दगडी (ता. कर्जत) परिसरात शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी सातच्या सुमारास गस्त घालत असलेल्या राशीन पोलिसांनी, तलवार व कारसह एकास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
राशीन (अहमदनगर) : बारडगाव दगडी (ता. कर्जत) परिसरात शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी सातच्या सुमारास गस्त घालत असलेल्या राशीन पोलिसांनी, तलवार व कारसह एकास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
उमेश भाऊसाहेब म्हस्के (वय 37, रा. तळवडी, ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस कर्मचारी तुळशीदास सातपुते, गणेश ठोंबरे, सचिन वारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राशीन-बारडगाव रस्त्यावर शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी पोलिस पथक गस्त घालत होते. मागून भरधाव आलेल्या कारचा संशय आल्याने, त्यांनी ती धुमकाई फाट्याजवळ अडविली व चालकाची चौकशी केली. त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी कारची झडती घेतली. त्यात एक लोखंडी तलवार मिळाली. पोलिसांनी चालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
संपादन : अशोक मुरुमकर