esakal | वाहतूक शाखा मालामाल; आठ महिन्यांत तिजोरीत दीड कोटी रुपये जमा
sakal

बोलून बातमी शोधा

One crore deposited with nagar city traffic police in Corona lockdown

कोरोनाचा संसर्ग वाढत असला, तरी पोलिस प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. लॉकडाउन काळातही वाहतूक शाखेनेही आपली भूमिका चोख बजावली.

वाहतूक शाखा मालामाल; आठ महिन्यांत तिजोरीत दीड कोटी रुपये जमा

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर :कोरोनाचा संसर्ग वाढत असला, तरी पोलिस प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. लॉकडाउन काळातही वाहतूक शाखेनेही आपली भूमिका चोख बजावली. विनाकारण फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली. जानेवारी ते 23 ऑगस्ट दरम्यान वाहतूक शाखेने शहरात कारवाई केली. त्यात सुमारे दीड कोटींचा महसूल मिळाला. त्यात जुलैमध्ये सर्वाधिक कारवाई करून महसूल मिळविला.

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक शाखेवर असून, पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 61 कर्मचारी शहरात कार्यरत आहेत. हे सर्व शहरातील वाहतूक सुरळीत ठेवताना, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत. एक जानेवारी ते 23 ऑगस्टदरम्यान वाहतूक शाखेने शहरात ट्रिपल सीट, विना हेल्मेट, सीट बेल्ट न लावणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, आदी प्रकारे वाहनधारकांवर कारवाईची मोहीम राबविली.

त्यात आठ महिन्यांत 55 हजार 112 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून एक कोटी 45 लाख 45 हजार 200 रुपयांचा महसूल जमा झाला. त्यातही जुलैमध्ये 12 हजार 231 वाहनांवर कारवाई करून 36 लाख 60 हजार 700 रुपयांचा महसूल जमा केला.

आठ महिन्यांतील ही मोठी कारवाई आहे. 22 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे एप्रिलमध्ये फक्त 250 वाहनांवर कारवाई झाली. त्यातून एक लाख 42 हजार 900 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.


महिना वाहनांची संख्या दंडाची रक्कम
जानेवारी :10,837 28,71,300
फेब्रुवारी ः 9901 24,14,800
मार्च : 6697 16,05,300
एप्रिल : 250 1,42,900
मे : 3392 7,92,700
जून : 7184 18,27,500
जुलै : 12231 36,60,700
23 ऑगस्टपर्यंत : 4620 12,30,000

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top