पिकअपची दुचाकीला धडक; एकजण जागीच ठार

राजू घुगरे
Wednesday, 26 August 2020

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण ठार झाल्याची घटना शेवगाव- पांढरीपुल रस्त्यावरील मळेगाव शिवारात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

अमरापूर (अहमदनगर) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण ठार झाल्याची घटना शेवगाव- पांढरीपुल रस्त्यावरील मळेगाव शिवारात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सुखदेव यादव गटकळ (वय ५५, रा. तेलकुडगाव, ता. नेवासे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

गटकळ हे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तेलकुडगाव येथून शेवगावकडे दुचाकीवरून जात होते. हनुमानवाडी रस्त्यावरुन शेवगाव पांढरीपुल रस्त्यावरील मळेगाव येथील चौफुलीवर आले असता शेवगावहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव पिकअपने त्यांना समोरुन जोराची धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले.

अपघातानंतर रघुनाथ सातपुते, चंद्रकांत निकम, ज्ञानेश्वर पंडित यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी नातेवाईकांना व पोीलसांना खबर दिली. मात्र तोपर्यंत पिकअप घेऊन वाहनचालक पसार झाला होता. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल राजू केदार करत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed of Pickup motorcycle accident on Shevgaon Pandharipul Road