Car-bicycle Accident : कार-दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी
Pathardi News : माळी बाभूळगाव शिवारात असलेल्या हॉटेल प्रेमसमोर पाथर्डीवरून अहिल्यानगरकडे जाणारी कार व पाथर्डीकडे येणारी दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात किरण धोत्रे जागीच मृत्युमुखी पडला.
पाथर्डी : शहराच्या लगत असलेल्या माळी बाभूळगाव शिवारात झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात एका वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला.