एक हजार ऊसतोड मजुरांना मिळाले किराणा साहित्य

संजय आ. काटे
Sunday, 20 December 2020

कुकडी व नागवडे साखर कारखान्यावर किराणा मालाचे वाटप उद्योगपती कल्याण तावरे, पराग मते, राज देशमुख, स्मितल वाबळे यांनी केले. गरीब, कष्टकरी लोकांसाठी काहीतरी सकारात्मक काम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

श्रीगोंदे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे येथील मुकुल माधव फाउंडेशन व राज देशमुख मित्रमंडळाने तालुक्‍यातील एक हजार ऊसतोडणी मजुरांना किराणा वस्तूची भेट दिली. किराणा मालाची शिदोरी मिळताच ऊस मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. 

कुकडी व नागवडे साखर कारखान्यावर किराणा मालाचे वाटप उद्योगपती कल्याण तावरे, पराग मते, राज देशमुख, स्मितल वाबळे यांनी केले. गरीब, कष्टकरी लोकांसाठी काहीतरी सकारात्मक काम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी अरुण पाचपुते, ऍड. अशोक रोडे, उदयसिंह जंगले, बंडोपंत धारकर, दादासाहेब गडाख, शेतकी अधिकारी राजेंद्र वनवे, सुभाष कुताळ, निळकंठ जंगले, सुशांत राऊत, डॉ. संग्राम देशमुख, सुशांत जवक उपस्थित होते. 

 

गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य ठेवा व त्यासाठी वाट्टेल ते त्याग करा ही शिकवण देणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला. 
- राज देशमुख, विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन, पुणे. 

लेकरांची भूक भागेल 
महागाईमुळे ऊसतोडणी धंदा परवडत नाही खूप अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या लेकरा बाळांची भूक भागणार आहे. 
- मधुकर येवले, ऊसतोडणी मजूर, नागवडे साखर कारखाना. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand sugarcane workers received groceries