esakal | कांद्याने गाठला चार हजारांचा टप्पा; शेतकऱ्यांमध्ये समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

Onion prices

कांद्याने गाठला चार हजारांचा टप्पा; शेतकऱ्यांमध्ये समाधान

sakal_logo
By
चंद्रकांत दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात तीन, चार महिन्यांपासून दोन हजाराच्या आसपास रखडलेला कांद्याचा भाव आजच्या लिलावात वाढला. एक नंबर कांदा ४१०० रुपये क्विंटल दराने विकल्याने शेतकऱ्यांचा चेहरा खुलला.


पावसाने उघड दिल्याने पहाटे पासूनच कांदा गोण्यांची आवक सुरु झाली होती. अकरा वाजता प्रत्यक्ष कांदा लिलाव सुरु झाले. सुरुवातीच्या एक तासात २५०० ते ३००० हजाराचा भाव निघाला. यानंतर बरेच वक्कल साडेतीन हजाराच्या पुढे गेले. काही वक्कलास चार हजार ते बेचाळीसशेचा भाव मिळाला. वीस दिवसात भाव दुपटीने वाढले. अडीच हजार ते सत्ताविसशेच्या भावात दुपटीने वाढ झाल्याने बळीराजा सुखावला. एक नंबर कांद्यास ४२०० रुपये, मध्यम कांद्यास ३२०० ते ३७००, तीन नंबर कांद्यास ३००० ते ३५०० तर गोल्टी कांद्यास दोन ते अडीच हजाराचा भाव मिळाला.

१९०० ते २२०० जोड कांद्यास एक हजाराच्या दरम्यान भाव मिळाला. आजच्या लिलावात आठ कोटी १५ लाखांची उलाढाल झाली, असे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणणार; नितीन गडकरींचे आश्वासन

loading image
go to top