
शिर्डी : मागील पंधरा दिवसांत कांद्याचे भाव अक्षरश: कोसळले. दिवाळीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले. या दिवाळ्याची विधानसभेत चर्चा झाली. येत्या आठ-दहा दिवसांत उन्हाळी कांद्याची मोठी आवक सुरू होईल. राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला तोंड देण्याची वेळ सरकारवर येणार आहे.