
अडीच हजार गोणींपेक्षा जास्त कांदा आला.तो उतरवून घेण्यासाठी उपबाजारात जागाच नव्हती. त्यामुळे अनेक तास कांदा घेवून आलेली वहाने रस्त्यात उभी राहिली. बाजार समितीचे सचिव अथवा सभापती, संचालक यांचे या उपबाजाराकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
श्रीगोंदे : बाजार समितीचा उपबाजार असणाऱ्या चिंभळे येथे कांदा लिलावात व्यापारी व शेतकऱ्यांची चांगलीच परवड झाली. काल पावसाने कांदा गोणी व्यापाऱ्यांना बाहेर काढता आल्या नाहीत. त्यातच आज पुन्हा मोठी आवक झाल्याने कांदा ठेवण्यासाठी पुरेशी सुविधाच नव्हती.
पर्यायाने शेजारील प्राथमिक व इंग्रजी माध्ययांच्या शाळांच्या खोल्यात कांदा ठेवावा लागला.
चिंभळे येथील उपबाजारात काही दिवसात कांद्याला चांगला दर मिळतोय. त्यातच लूजसह व गोणी कांदा लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा या उपबाजारात वाढला आहे.
काल तेथे सुमारे सहा हजार गोणींचा आवक झाली. आज जास्तीचा कांदा येणार नसल्याचा समिती व्यवस्थापनाचा अंदाज चुकला. त्यातच काल पावसामुळे घेतलेला कांदा व्यापाऱ्यांना तेथून बाहेर काढता आला नाही. त्यातच आज अडीच हजार गोणींपेक्षा जास्त कांदा आला.
तो उतरवून घेण्यासाठी उपबाजारात जागाच नव्हती. त्यामुळे अनेक तास कांदा घेवून आलेली वहाने रस्त्यात उभी राहिली. बाजार समितीचे सचिव अथवा सभापती, संचालक यांचे या उपबाजाराकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
अपेक्षेपेक्षा जास्त कांदा आवक झाली. त्यातच काल पाऊस झाल्याने व्यापाऱ्यांना घेतलेला पहिला कांदा बाहेर काढता आला नाही. यापुढे असे होणार नाही याची दक्षता घेतली जात असून नवे बांधकाम केले जाईल.
-संजय जामदार, सभापती बाजार समिती.संपादन - अशोक निंबाळकर