Onion Rate Increase
sakal
पारनेर - पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. २२) उन्हाळी गावरान जुन्या कांद्याला अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चांगला बाजारभाव मिळाला. २३७ गोण्यांना चार हजार ९०० ते पाच हजार १०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. इतर कांद्याला चार हजार ३०० ते चार हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.