कांद्याच्या भावात मोठी घसरण, तब्बल सात हजारांनी भाव पडले

विनायक दरंदले
Monday, 26 October 2020

भाववाढ व भावपाडीच्या या प्रकाराने शेतकरी द्विधामनस्तीत आला आहे.भावाचा गफला लक्षात घेवून शेतकरी आता दर मोंढ्याला मोजकाच माल विक्रीसाठी आणत आहेत.

सोनई:राज्यातील सर्व भागातील कांदा अतिवृष्टीने खराब झाला आहे. उत्पादन कमी निघाल्याने मोठी मागणी होत आहे. दिवसेंदिवस भाग वाढत असताना नेवाशात कांद्याने पुन्हा रिव्हर्स गिअर टाकला आहे. त्यामुळे शेतकर्यांत काहीशी नाराजी आहे.

नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज कांद्याच्या भावात दोन हजाराची घसरण होवून चार ते पाच हजार क्विटंलचा
सर्वसाधारण भाव निघाला.

मागील सोमवारी आवक कमी असताना एक नंबरचा कांदा दहा हजार रुपये क्विंटलने विकला होता. काही गोण्यांना बारा हजाराचा भाव मिळाला होता.ही
चांगली स्थिती असताना दोनच दिवसाने भाव दोन हजाराने व आज लगेच पुन्हा दोन हजाराने भाव घसरले आहे.

भाववाढ व भावपाडीच्या या प्रकाराने शेतकरी द्विधामनस्तीत आला आहे.भावाचा गफला लक्षात घेवून शेतकरी आता दर मोंढ्याला मोजकाच माल विक्रीसाठी आणत आहेत.

आज बाजारात तेवीस हजार 687 गोण्यांची आवक झाली.मोजक्या गोण्यास सहा ते साडेसहा हजाराचा भाव मिळाला.मोठ्या कांद्यास चार ते साडेपाच हजार,
मध्यम कांद्यास चार हजार तर हलक्या कांद्यास पाचशे ते एक हजार भाव मिळाला.आज पाच कोटी 27 लाखाची उलाढाल झाली आहे.अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices fell sharply by Rs 7,000