Onion rate Hike
sakal
सोनई - कांद्याने दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. काही कांदा गोण्यास तीन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळू लागल्याने घोडेगाव (ता. नेवासे) येथील उपबाजारात आवक दुपटीहून अधिक वाढली आहे. बुधवारी (ता. १) ८३ हजार ४४७ कांदा गोण्याची विक्रमी आवक झाली होती. एका आठवड्यातील चार लिलावांत दोन लाख ६८ हजार ५४० गोण्यांची आवक होऊन २७ कोटींची उलाढाल झाली आहे.