आगारातच कांदा सडला, तेरा हजार हेक्टर पाण्यात

Onion rotted in the depot itself, in thirteen thousand hectares of water
Onion rotted in the depot itself, in thirteen thousand hectares of water
Updated on

संगमनेर ः संगमनेर तालुक्याच्या पठार भागात झालेली अतिवृष्टी व ढगफुटीने तालुक्यातील खरीपाची पिके उध्वस्त झाली. या बरोबरच कांदा उत्पादनाचे आगार समजले जाणाऱ्या पठारातील कांद्याचे बहुतांश क्षेत्र नष्ट झाल्याने केलेला खर्चही निघणार नाही अशी अवस्था आहे.

संगमनेर तालुक्यातील इतर गावांसह पठार भाग कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. झोळे, चंदनापुरी, सावरगाव तळ, पेमगिरी, पोखरी बाळेश्वर, सावरगाव घुले, सारोळे पठार, ढोरवाडी, लरुडी पठार, नांदूर खंदरमाळ आदी गावातील सुमारे 12 ते 13 हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा पीकाचे उत्पादन घेतले जाते.

या वर्षी जून, जुलै महिन्यात खरिपाच्या 6 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर शेंदरी लाल कांद्याची लागवड करण्यात आली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात फुरसुंगी या उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते.

अद्यापि लागवड सुरु असल्याने या बाबत अद्याप निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी हे क्षेत्रही सुमारे साडेसहा हजार हेक्टर असते. कांदा पीकासाठी मशागत, सुमारे तीन ते चार हजार रुपये प्रति किलो दराने घेतलेले कांदा बियाणे, आंतर मशागत, खते, तणनाशक, कीटकनाशकांची फवारणी, मजूरी यासाठी एकरी सुमारे 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो. मात्र, मध्यंतरी झालेल्या मुसळधार व ढगफुटी सदृश पावसाने, वाहिलेल्या पाण्यामुळे जमिनींची मोठ्या प्रमाणात धूप झाली. 

पाण्याबरोबर माती वाहिल्याने पिके वाहून गेली. तसेच कमी पाणी लागणाऱ्या या पिकाला सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने, एक ते दीड महिन्यापूर्वी लावलेल्या कांदा पिकांच्या मुळ्या सडल्या तसेच पातीला पीळ पडल्याने पीकाची वाढ खुंटली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन, बंद असलेल्या बाजारपेठेमुळे थांबलेले अर्थचक्र यातून सावरू पहाणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा अस्मानी संकट आले आहे.

कांदा साठवण्याची व्यवस्था असलेल्या काही शेतकऱ्यांचा अपवाद वगळता या वर्षी कांदा विक्रीला लवकर उपलब्ध होणार नाही अशी शंका व्यक्त होत आहे. कांदा लागवडीच्या रोपासाठी बियाणांची टंचाई जाणवत असल्याने वाढीव दराने बियाणे खरेदी करावे लागणार आहे.

तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला असला तरी, आपत्कालिन नुकसान भरपाईसाठी शासकीय निकषाप्रमाणे त्या गावात 65 मिलीमीटर पाऊस एका दिवसात पडणे अपेक्षित आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे या निकषात बसत नसल्याने नुकसान भरपाई मिळण्यापासून कांदाउत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत.

 

महसूल विभागाचे नुकसान भरपाईचे निकष पूर्ण होवू शकत नाही. प्रत्यक्ष नुकसान झालेली असतानाही शेतकरी दोन्ही बाजूंनी अडचणीत आला आहे. महसूल मंडळातील पावसाची एकत्रित सरासरी आकडेवारी गृहीत धरली जाते. मात्र, त्या मंडळातील गावांना कमी जास्त प्रमाणात लहरी निसर्गाचा फटका बसू शकतो. ही शक्यता लक्षात घेवून वस्तूनिष्ठ पंचनामे करावेत. अशा परिस्थितीसाठी प्रत्येक गावात स्वतंत्र पर्जन्यमापक बसवावे म्हणजे पुढील काळात नेमका पर्जन्य समजणे सोपे होईल.

- अण्णासाहेब काळे, कांदा उत्पादक शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com