अकोले तालुक्यात शिक्षण अधिकारी आहेत की नाहीत?

Online education has been disrupted in Akole taluka due to lack of education officer.jpg
Online education has been disrupted in Akole taluka due to lack of education officer.jpg
Updated on

अकोले (नगर) : तालुक्यात ऑनलाईन शिक्षण केवळ काही ठिकाणी सुरू आहे. प्रभारी गट शिक्षण अधिकारी तालुक्यात आहेत की रजेवर हे समजत नाही. त्यामुळे तालुक्याला पूर्ण वेळ गट शिक्षणाधिकारी दिल्यास शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास पेसा ग्राम पंचायत सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस पांडुरंग खाडे यांनी केला आहे. याबाबत शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक, उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी, माजी आमदार वैभव पिचड यांना निवेदन देण्यात आले आहे. 

गेली आठ महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट आल्याने शिक्षण बंद आहे. विद्यार्थी घरीच आहे. शाळा इमारती बंद पडल्या आहेत. त्यांची दुरुस्ती केली नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्याचे प्रभारी शिक्षण अधिकारी यांचे याबाबीकडे लक्ष नसून ते रजेवर आहेत की कामात व्यग्र आहे हे समजत नाही. आदिवासी अतिदुर्गम भागात शिक्षण नसल्याने विद्यार्थी शेतावर व गुरे चरण्यासाठी शेतात आणि जंगलात जातात. शिक्षक कधी येतात तर कधी येत नाही. त्यामुळे आदिवासी मुले शाळाबाह्य होण्याची भीती आहे. शिक्षकांनी स्थानिक ठिकाणी राहणे आवश्यक असल्याने तसे होताना दिसत नाही.

प्रभारी शिक्षण अधिकारी यांना अनेक वेळा लेखी अर्ज देऊनही अजूनही आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. शाळा सुरू झाल्या तरी बसायचे कुठे हा प्रश्न आहे. मबेशी, भंडारदरा, सवरकुठे, इदे वाडी, गोंदुशी आदी दहा गावात इमारतीची पडझड झाली असून याबाबत जिल्हा परिषद निर्णय घेत नाही. यामुळे तातडीने इमारतीची दुरुस्ती व्हावी. प्रभारी गट शिक्षण अधिकारी न देता पूर्णवेळ गट शिक्षण अधिकारी प्रशासनाने नियुक्त करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com