
श्रीरामपूर : शहरातील एका महाविद्यालयात संभाजीनगर जिल्ह्यातील एक विद्यार्थिनी शिक्षण घेते. तिची स्नॅपचाटवर मेहकर (जि. बुलढाणा) येथील एका युवकाशी ओळख झाली. त्यानंतर सदर युवती शिर्डी येथे त्याच्यासोबत दर्शनासाठी गेली असता तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी सदर युवकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.