बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या प्रश्‍नाची उत्तरे सुधारीत कृषी कायद्यातही : पंतप्रधान मोदी

अशोक मुरुमकर
Tuesday, 13 October 2020

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वत: ला समर्पीत केले होते. ते स्वत: सत्तेपासून व राजकारणापासून अलिप्त राहीले नाहीत.

अहमदनगर : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वत: ला समर्पीत केले होते. ते स्वत: सत्तेपासून व राजकारणापासून अलिप्त राहीले नाहीत. पण त्यांनी राजकारण हे समाजासाठी केले आहे. गाव व गरिबांच्या प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. आजही विखे पाटील कुटुंबाचे प्रत्येक पक्षात चांगले संबंध आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. याबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, गाव आणि गरिबांच्या विकासासाठी यांचे योगदार आहे. येणाऱ्या पिढीला त्यांची प्रेरणा मिळेल. हे पुस्तक युवकांसाठी व आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. गाव, गरिब व शेतकऱ्यांचे दुख: त्यांनी स्वत: पाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांनी सहकारातून विकास केला. 

सहकारी चळवळ ही खरी निधर्म चळवळ आहे. ती कोणत्या जातीची व धर्माची नाही. सहकार निपक्ष असते. त्यात सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व असते. ‘देह वेचावा कारणे’ हे नाव खूप प्रासंगीक आहे. ज्या देशात ग्रामीण शिक्षणाची चर्चा होत नव्हती. तेव्हा प्रवारा शिक्षण संस्थेने गावात शिक्षणाबद्दल काम सुरु केले. अशात प्रवरा रुरल सोसायटीला त्यांचे नाव देणे गरजेचे आहे. त्यांनी आत्मकथेत लिहीले आहे, की शेतीत शिक्षण असल्याशिवाय ते स्वत: विकास करु शकत नाहीत. शेतीचे कौशल्य नसेल तर शेती करुन शकत नाहीत. असं असेल तर त्याला एंटरप्राजेस का म्हणत नाहीत. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रश्‍नाचे उत्तर सुधारीत शेतकरी कायद्यातही आहे. एंटरप्रायजेसकडे शेतीला घेऊन जाण्याचा यातून प्रयत्न आहे. दुधाची क्रांती गुजरातमध्ये झाली. लोकल इकोनॉमी देशाला पुढे घेऊन जाईन. देशात पोटभर अन्न नव्हते. तेव्हा शेतकरी काय पीक, घेईल काय बदल करेल, असेही मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online publication of the book of late Balasaheb Vikhe Patil