ग्रामीण भागातही अॉनलाईन खरेदीची धूम, बाजारपेठांवर परिणाम

गौरव साळुंके
Friday, 30 October 2020

गेल्या काही महिन्यात तरुणाई आणि उच्चशिक्षित वर्गाचा आॅनलाईन खरेदीकडे कल वाढला आहेत. विविध कपड्यांपासून मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ऑनलाईन खरेदी केली जाते.

श्रीरामपूर ः गेल्या काही वर्षापुर्वी पुणे-मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर अशा महानगरासह शहरी भागात आॅनलाईन खरेदी होत. परंतु सध्या ग्रामीण भागातही आॅनलाईन खरेदीला मोठी पसंती मिळाली आहे.

तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्या आणि खेडे-गावातील तरुणाई आता आॅनलाईन खरेदीकडे आकर्षिक झाल्याचे दिसते. ग्रामीण भागातील शेकडो ग्राहकांनी यंदाच्या सण-उत्सवात स्थानिक बाजारपेठेत खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला पसंती दिली. आजही बाहेर कोरोनाचा धोका कायम असुन ऑनलाईन खरेदीवर आकर्षक सवलती सुरु असल्याने ऑनलाईन खरेदीवर भर दिला जातो. परिणामी स्थानिक बाजारपेठेतील कोट्यावधींची उलाढाल त्यामुळे प्रभावित झाल्याचे येथील काही व्यावसायीक सांगतात. 

नुकत्याच झालेल्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसुन आली. परंतू शेकडो ग्राहकांनी मात्र यंदा बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या आॅनलाईन खरेदी केल्याचे समोर आले आहेत.

आगामी दिवाळी सण-उत्सवामुळे ऑनलाईन बाजारात सध्या आकर्षक सवलती सुरु आहेत. लाॅकडाउनमध्ये विविध साहित्य बाजारपेठेत अनेक दिवस पडून होते. त्यामुळे ग्राहकांनी आता नव्या स्टॉकसाठी ऑनलाईन खरेदीला पसंती मिळाली आहे.

गेल्या काही महिन्यात तरुणाई आणि उच्चशिक्षित वर्गाचा आॅनलाईन खरेदीकडे कल वाढला आहेत. विविध कपड्यांपासून मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ऑनलाईन खरेदी केली जाते. दरवर्षी दिवाळीच्या पुर्वीचे काही दिवस स्थानिक बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. परंतु गेल्या काही वर्षांत स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी ऑनलाईन खरेदीकडे वळाल्याचे दिसते.
त्यात कोरोनाच्या संकटामुळे यंदा ऑनलाईन बाजाराला चांगले दिवस आले आहे.

कोरोनाच्या धास्तीने बाजारातील गर्दीपासून दुर राहुन अनेक ग्राहकांनी आॅनलाईन खरेदी केल्याचे सांगितले. स्थानिक बाजारात आवडीनुसार आणि माफक दरात अनेक वस्तु उपलब्ध होत नाही. परंतु ऑनलाईन बाजारात सहजपणे हव्या असलेल्या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. आणि वेळेत घरपोचही होतात. तसेच ऑनलाईन बाजारात अनेक वस्तु खरेदीसाठी कर्जासह इएमआयची सुविधा मिळते.

आॅनलाईन खरेदीत आकर्षक सवलतीमुळे आर्थिक बचतीमुळे निमशहरी भागासह ग्रामीण भागातील शेकडो ग्राहक आॅनलाईन खरेदी करणे पसंत करतात. परिणामी स्थानिक बाजारपेठातील व्यावसायिकांना ऑनलाईन खरेदीचा फटका बसल्याचे शहरातील अनेक व्यावसायिक सांगतात.

यंदा ऐन सण-उत्सवात स्थानिक बाजापेठेतील दरवर्षीचा लाखों रुपयांचा व्यवसाय आॅनलाईन बाजारपेठांनी खेचला आहे. विविध ऑनलाईन बाजार कंपन्यांनी आता स्थानिक बाजारपेठातील 30 टक्के व्यापार आकर्षित केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online shopping in rural areas also impact on markets