esakal | नगरकरांनो बाहेर पडू नका, नोंदणी करणारांनाच लस

बोलून बातमी शोधा

व्हॅक्सीन

नगरकरांनो बाहेर पडू नका, नोंदणीशिवाय डोस मिळणार नाही

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः शहरात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना, ऑनलाइन नोंदणी असेल तरच लस देण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटातील ऑनलाइन नोंदणी न झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांसमोर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केले आहे.

शहरातील केडगाव, भोसले आखाडा, माळीवाडा व मुकुंदनगर येथील आरोग्य केंद्रांवर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांनाच कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी मात्र आवश्‍यक आहे.

नोंदणी झालेल्या नागरिकांनाच लसीकरणाचा पहिला डोस देण्यात येईल. ऑनलाइन नोंदणी न केलेले नागरिकही आज आरोग्य केंद्रावर आल्याने गर्दी झाली. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी झाल्याशिवाय घराबाहेर पडू नये.

कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या, तरीही 21 दिवस सोशल डिस्टन्सचे नियम पाळावेच लागतात. त्यामुळे नागरिकांनी घाई न करता ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करूनच लस घ्यावी. 45 वर्षांवरील नागरिकांना केवळ दुसरा डोस देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची आवश्‍यकता नाही. या नागरिकांसाठी तोफखाना, सावेडी येथील आरोग्य केंद्र व आयुर्वेद महाविद्यालय येथे लसीकरणाची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. बोरगे यांनी दिली.

ऑनलाइन नोंदणीतील अडचणी

  • - ऑनलाइन नोंदणी करताना "ओटीपी' लवकर येत नाही. - रजिस्ट्रेशन झाले तरी लसीकरणासाठी तारीख व वेळेचा स्लॉट क्‍लिक होत नाही.

  • - केंद्रावर होणाऱ्या लसीकरणाचा उपलब्ध आकडा दिसतो. तो कमी होतानाही दिसतो. त्यामुळे नोंदणी कोठून तरी होत असल्याचे (गडबडीची शक्‍यता) लक्षात येते.

  • - संबंधित चालू दिवसाचे बरेचसे स्लॉट "बुक्‍ड' दाखविले जातात; मात्र पुढील दिवसांच्या स्लॉटबाबत "नो सेशन अव्हेलेबल' दाखविले जाते.

  • - टाइम स्लॉट कधी सुरू होणार, कधी बंद होणार, याबाबत संकेतस्थळावर काहीही माहिती मिळत नाही.

  • वरील अडचणींमुळे नागरिकांत संभ्रम व तीव्र नाराजी आहे.

  • ऍपवर खासगी रुग्णालयेही

मुकुंदनगरचा मंगळवारचा (ता. चार) स्लॉट बुक दाखविण्यात आला आहे; मात्र उर्वरित तीन ठिकाणी स्लॉट उपलब्ध करण्यातच आले नव्हते. सेंटरमध्ये शहरातील खासगी रुग्णालयांचीही ("पेड' लसीकरण) नावे उपलब्ध आहेत; मात्र प्रत्यक्षात या रुग्णालयांना डोसच उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.