नगर जिल्ह्यात पाच वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा

विलास कुलकर्णी
Wednesday, 11 November 2020

राहुरी तालुक्यात 50 पैकी 45 ठिकाणी ग्रामस्थांनी वाळू घाटांच्या लिलावाला विरोध केला. उर्वरित पाच ठिकाणी महसूल खात्याने वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी तालुक्यात 50 पैकी 45 ठिकाणी ग्रामस्थांनी वाळू घाटांच्या लिलावाला विरोध केला. उर्वरित पाच ठिकाणी महसूल खात्याने वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली.

मुळा नदीपात्रातील तीन व प्रवरा नदीपात्रातील दोन ठिकाणी वाळू घाटांमध्ये प्रस्तावित वाळू उत्खनन बाबत पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी झाली. ग्रामस्थांचा विरोध नसल्याने या पाच ठिकाणी वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा प्रशासनाला राहुरी तालुक्यातील पाच ठिकाणी वाळू घाटांच्या लिलावासाठी 19 हजार 334 ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे. त्यातून महसूल विभागाला सात कोटी 20 लाख 73 हजार रुपये रॉयल्टी मिळणे अपेक्षित आहे. जानेवारी 2021 मध्ये वाळू घाटांचे जाहीर लिलाव होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी वाळू लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. तरी, राहुरी तालुक्यातील महसूलची वसुली शंभर टक्केपेक्षा जास्त झाली. यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर होणार्‍या वाळू लिलावावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.

राहुरी तालुक्यातील वाळू घाटांचे प्रस्तावित लिलाव असे : 
गाव           नदीपात्र        ब्रास        रॉयल्टी 
राहुरी           खुर्द- मुळा     1272               47 लाख 40 हजार
पिंपरी        वळण/चंडकापूर, मुळा 1074           40 लाख 20 हजार
वळण            मुळा        8110              3 कोटी 2 लाख 25 हजार
रामपूर           प्रवरा        3578              1 कोटी 33 लाख 35 हजार
सात्रळ           प्रवरा        5300               1 कोटी 97 लाख 53 हजार  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open the way for auction of five sand ghats in Rahuri in Nagar district