
अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार येथील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बबन ऊर्फ अशोक आसाराम शिर्के (रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करून शेतात लावलेली ४ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीची अफूची चार हजार २७५ लहान-मोठी झाडे जप्त केली आहेत. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. अहिल्यानगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.