esakal | आता कोरोनाबाधितांच्या पिंडाला कावळाही शिवणार नाही

बोलून बातमी शोधा

Opposition of Brahmin Sangh to perform Dashakriya ritual

कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असला तरी इतरांनाही त्याचा फटका बसणार आहे.

आता कोरोनाबाधितांच्या पिंडाला कावळाही शिवणार नाही
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगरमध्ये भयानक स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आता किमान वीस दिवस मृतांच्या पिंडालाही कावळा शिवणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नगरमधील दशक्रिया विधी 30 एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित मंडळींनी घेतला आहे. कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असला तरी इतरांनाही त्याचा फटका बसणार आहे. इथे दशक्रिया विधी होणार नसले तरी तीर्थस्थळीही मंडळींना पौरोहित्य करणार नकारघंटा सुरू केली आहे.

अमरधाम येथे कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली. 

जोशी म्हणाले, ""अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाममध्ये दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. मृत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती नातेवाईक देत नाहीत.

नातेवाइकांच्या संपर्कात आल्याने पुरोहित बाधित होत आहेत. त्यामुळे पुरोहितांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोरोनाने होणारे मृत्यू व पुरोहितांची सुरक्षितता, आदी बाबींचा विचार करून नगर जिल्हा पुरोहित मंडळाने 30 एप्रिलपर्यंत अमरधाममध्ये कोणतेही धार्मिक विधी न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.''