esakal | कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्काराला विरोध कायम

बोलून बातमी शोधा

अमरधाम अहमदनगर

कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्काराला विरोध कायम

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः नालेगाव स्मशानभूमी मध्यवर्ती शहराच्या लगत आहे. येथे होत असलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यविधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आता नालेगाव स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास विरोध दर्शविला आहे.

नालेगाव गावठाण, सुडकेमळा, बागरोजा हडको, दिल्लीगेट, पटवर्धन चौक, कल्याण रस्ता परिसर, ठाणगे मळा या परिसरासह दाट लोकवस्ती आहे. कोरोनाबाधितांच्या अंत्यविधीमुळे मोठ्याप्रमाणात धुराचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे स्मशानभूमीच्या आजूबाजूला असलेल्या परिसरातील नागरिकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व महापालिकेने कोविड रुग्णांच्या अंत्यविधीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

नालेगाव स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यविधी व्यतिरिक्‍त इतर अंत्यविधी करावेत, अशी मागणी नालेगावातील नागरिकांनी केली.

यावेळी नगरसेवक श्‍याम नाळकांडे, नगरसेवक गणेश कवडे, अजय चितळे, संतोष लांडे, वैभव वाघ, राम वाघ, विकी वाघ, गणेश कुलथे, दीपक घोडेकर आदी उपस्थित होते.