esakal | हॉटेलची चव झाली बेचव; कामगार गेले म्हणून "हा' शोधला पर्याय 
sakal

बोलून बातमी शोधा

Other state workers going to your home forme Problems with hotels

राज्यभरातील हॉटेल कोरोनामुळे सुमारे तीन महिन्यापेक्षा अधिक काळ बंद होती. ती आता नुकतीच सुरू झाली आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात बाहेरच्या राज्यातील हॉटेलमध्ये काम करणारे बहुतेक कामगार आपल्या राज्यात निघून गेल्याने हॉटेलमध्ये कामगार राहीले नाहीत. वेटर संख्या कमी असल्याने अनेकदा मालकालाच ऑर्डर घ्यावी लागत आहे.

हॉटेलची चव झाली बेचव; कामगार गेले म्हणून "हा' शोधला पर्याय 

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : राज्यभरातील हॉटेल कोरोनामुळे सुमारे तीन महिन्यापेक्षा अधिक काळ बंद होती. ती आता नुकतीच सुरू झाली आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात बाहेरच्या राज्यातील हॉटेलमध्ये काम करणारे बहुतेक कामगार आपल्या राज्यात निघून गेल्याने हॉटेलमध्ये कामगार राहीले नाहीत. वेटर संख्या कमी असल्याने अनेकदा मालकालाच ऑर्डर घ्यावी लागत आहे. 
लॉकडाऊनमध्ये अनेक दिवसांपासून हॉटेल व्यावसाय बंद होते. त्या काळात अनेक हॉटेल मालकांनी कामागरांना काही काळ सांभळले. मात्र त्या नंतरच्या काळात कामगारही काही केल्या थांबेना. शेवटी कामगार निघून गेले आहेत. आता हॉटेल सुरू झाले आहेत. परंतू कामगार नसल्याने हॉटेल चालकांची मोठी पंचायत झाली आहे. हॉटेलमध्ये वेटरसह अचारीही नसल्याने अनेक हॉटेलमध्ये मालकालाच काम करावे लागत आहेत. बहुतेक हॉटेलमध्ये काम करणारे कामगार हे परराज्यातील विशेषताः उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यातीलच मोठ्या प्रमाणात होते. आता कोरोनाच्या भितीपोटी हे सर्व कामगार आपआपल्या राज्यात निघून गेले आहेत. हॉटेल व्यवसाय सुरू झाला असला तरी आद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे हे गेलेले कामगार परत येणार का? असा प्रश्‍न हॉटेल चालकांसमोर उपस्थीत होत आहे. 
कोरोनामुळे अद्यापही लोक फारसा प्रवास करत नाहीत व प्रवास केला तर अनेकदा हॉटेलमध्ये जाऊन जेवन करण्याचे अनेकदा प्रवाशी टाळत आहेत. अनेक प्रवाशी आपले डबे घरूनच घेऊन निघत आहेत. जेवण व पाणी सुद्धा अता अनेकांना घरचेच आवडू लागले आहे. आजून अनेकांच्या मनातील कोरोनाची भिती गेली नाही. प्रत्येकजण कोरोनाच्या भितीने काळजी घेत आहे. तीन महिने अनेकांनी कामगार सांभाळले. तसेच आताही ग्राहक नसल्याने हॉटेल व्यवसायीक तोट्यात गेले आहेत. आता हॉटेल सुरू झाले असले तरी ग्राहक कमी असल्याने भाजीपाला किती आणावा व तो आनल्यानंतर संपेल का अशी चिंता हॉटेल मालकांना लगली आहे. आता कामगार मिळतील का यासाठी ते आपल्या जुण्या कामगारांना फोन करूऩ बोलावत आहेत. मात्र ते येण्यास फारसे इच्छूक नाहीत. 
हॉटेलसाठी कामगार पुरवाणारी काही मंडळी कमिशनवर कामगार पुरवत असतात. त्यांनाही आता कामगार मिळत नसल्याने त्यांनीही हात टेकले आहे. 
संपादन : अशोक मुरुमकर