Women's day : साडेसहा हजार महिलांचा गृहप्रवेश; महिला दिनी विविध घरकुल योजनांतून लाभ
Ahilyanagar News : नगर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनमधील घरकुल ८१ हजार ७३८ मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर घरकुलांच्या लाभार्थींपैकी ६८ हजार ३११ लाभार्थींना घरकुलाचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे.
Over 6,500 women celebrate their new homes with joy and pride on Women’s Day, thanks to the housing schemes."Sakal
अहिल्यानगर : जिल्ह्यातील तब्बल साडेसहा हजार महिलांनी त्यांच्या कुटुंबासह आज गृहप्रवेश केला. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास, शबरी आवास, मोदी आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनांतील महिलांना महिला दिनी ही पर्वणी साधता आली.