खळबळजनक ः पद्मश्री तात्याराव लहानेंचे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Padma Shri Tatyarao Lahane's serious allegations against the Fadnavis government
Padma Shri Tatyarao Lahane's serious allegations against the Fadnavis government
Updated on

सोनई (जि.अहमदनगर): डॉ. तात्याराव लहाने हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. राजकीय वर्तुळातही त्यांना मोठा मान आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले आहे. परंतु त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

वंजारवाडी (ता.नेवासे) येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या पुरस्कारानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विष्णू केंद्रे महाराज होते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार तुकाराम गडाख, युवा नेते उदयन गडाख, भगवान महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष जावळे उपस्थित होते. 

मागील फडणवीस सरकारचा खुप त्रास सहन करावा लागला. पद्मश्री मिळाल्यानंतरही खुप सहन करावं लागलं, अशी खंत पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.

मुंडेंकडून माणसं जपायला शिकावं

आघाडी सरकार आल्यानंतर मंत्री मुंडे यांनी विधानसभा व विधान परिषदेत माझी बाजू मांडत मला शासनस्तरात काम करण्याची संधी दिली. प्रेम कसं करावं व आपल्या माणसांना कसं जपावं, हे धनंजय मुंडे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असे सांगून 
डाॅ. लहाने यांनी डोळ्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक माहिती देत सप्ताह सोहळ्यातून आत्मिक समाधान लाभल्याचे सांगितले. 

वाड्या-वस्त्यांना जाती-पातीचं नावं नको

मंत्री मुंडे म्हणाले, "डाॅ.लहाने या उतुंग व्यक्तीमत्वाचा सन्मान माझ्यासारख्या लहान माणसाच्या हातून झाला हे माझे खूप मोठे भाग्य आहे. "पुरोगामी महाराष्ट्रात कुठल्याही वाडी व गावाला
कुठल्याही जातीचे नाव असणे परवाडणारे नाही. संत, महंत व राष्ट्रपुरुषांचे नाव द्या. मात्र, जातीचे नको, असे ते म्हणाले. मंत्री माजी खासदार गडाख, युवा नेते उदयन गडाख यांचेही भाषण झाले.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com