
शिर्डी : केंद्र सरकारने पॅन कार्डच्या (PAN 2.0) नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, त्यासाठी पॅनकार्डधारकांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. नवे पॅन कार्ड थेट आपापल्या पत्त्यावर येणार आहे, अशी माहिती कोपरगाव येथील करसल्लागार नितीन डोंगरे यांनी दिली.