शनिदेव आणि साईबाबांमुळे पंडित जसराज सिनेमात गेले नाही....

Pandit Jasraj did not go to the cinema because of Shanidev and Sai Baba ....
Pandit Jasraj did not go to the cinema because of Shanidev and Sai Baba ....
Updated on

नेवासे : चित्रपट क्षेत्रात जायचे नाही हा निर्णय अध्यात्मिक उर्जेतून घेतला. ही ऊर्जा शनिदेव व साईबाबा यांच्यामुळे मिळाली, असे शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शनीदेव दर्शनानिमित्त आलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय संगीत गायक पद्मविभूषण पंडित जसराज सांगत होते.    

शनीभक्त  असलेले जसराज यांनी पुन्हा  शनिशिंगणापूर ( ता. नेवासे ) येण्याचे सांगितले होते. पण आता त्यांच्या निधनाने ही भेट पुन्हा होणे नाही. याची हुरहूर आहे, असे पोलीस पाटील सयाराम बानकर यांनी सांगितले.

मागील वर्षी जानेवारीत शनिशिगणापूर (ता.नेवासे) येथे पंडीत जसराज यांनी शनिदेवाचे दर्शन घेत अभिषेक केला. यावेळी त्यांच्या शिष्या पद्मश्री प्रिती मुखर्जी गायक रामरतन शर्मा, गायक प्रसाद दुसाने उपस्थित होते.

हेही वाचा - या कारणामुळे पेटतो मराठवाडा-नगरचा संघर्ष

संस्थानच्या वतीने पोलीस पाटील सयाराम बानकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर पंडीत जसराज भावूक झाले होते. अभिषेक करण्यासाठी तीन दिवस ते शनिशिंगणापूर येथे मुक्कामी होते. नंतर ते शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईला गेले होते. पंडित जसराज यांच्या शनिशिंगणापूर भेटीत त्यांचा साधेपणा अनुभवायला मिळाला.

पत्रकार अशोक तुपे, शिवाजी घाडगे, नवनाथ कुसळकर , उद्योजक राजू ओस्तवाल यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता.
पंडीत जसराज म्हणाले होते, संगीत व अध्यात्म एकच आहेत. ते वेगळे करता येत नाही. संगीतातील स्वर हा अध्यात्मात बुडून गेल्यानंतरच निर्माण होतो. स्वरसाधना हे अध्यात्मच आहे. मी शनिशिंगणापूरला शनिदेवाच्या दर्शनासाठी अनेकवेळा आलो. पण आजच्या दर्शनाने मोठा आनंद मिळाला. माझ्या स्वरसाधनेमागे भगवंतांची मेहेरबानी आहे. मला खूप काही मिळाले. संगीतसाधना करता आली. अध्यात्मिक शक्ती व उर्जेमुळे हे घडले. शास्त्रीय संगीतात नाव कमावलेले अनेक बुजूर्ग कलावंत आहेत. मात्र आता तरुण पिढी या क्षेत्रात नव्याने येत आहे. त्यांच्याकडे संगीतसाधनेकरिता लागणारी बुद्धी व कष्ट करण्याची क्षमता आहे. त्यांच्याबद्दल मला आशा आहे.

शास्त्रीय संगीत जगात अजरामर झाले. हेच काम ते पुढे नेतील, शास्त्रीय संगीत गायनात देशात मोठे गायक झाले. त्यांची जागा आता नवीन पिढी घेईल. संगीतात बिघडल्याची चर्चा अधिक होते. मात्र त्यात तथ्य नाही. पूर्वीदेखील अशी चर्चा होत होती. पाश्चात्य संगीताचा प्रभाव वाढत असल्याची चर्चाही निरर्थक आहे.

अभिजात संगीत व गायकी यापुढेही तरुणपिढीमुळे टिकून राहील. आम्ही काम केले. त्याहीपेक्षा ही पिढी अधिक चांगले काम कलेच्या क्षेत्रात करील, चित्रपटाच्या क्षेत्रात आपण गेलो नाही. जायचे नाही, असे ठरविले होते. हा निर्णय केवळ अध्यात्मिक उर्जेतून झाला. तो कसा झाला हे मला आजही कळत नाही. मात्र अध्यात्मिक धारणा त्यामागे आहे. ही सारी शनिदेव व साईबाबांची कृपा आहे.असे त्यांनी सांगितले होते.

प्रत्येकजण कलेच्या क्षेत्रात घडत असतो. घडत असतांना त्याग भावना व सुखाचा आनंद महत्वाचा असतो. माझ्याहातून या क्षेत्रात विपरीत काही घडले नाही. ही नियतीची देणगी आहे. परमेश्वरानेच माझ्याकडून साधना करुन घेतली, असेच मला वाटते. असे ते म्हणाले.

अनुराधा पौडवाल, संजीव अभ्यंकर, कविता कृष्णमुर्ती, साधना सरगम आदि अनेक शिष्य शिकले. ते मला गुरुस्थानी मानतात. हा त्यांचा माझ्याबद्दलचा आदर आहे. अनुराधा पौडवाल यांनी शनिदेवांच्या भजनांची ध्वनिफीत पहिल्यांदा काढली. त्यांनी खूप मोठे काम केले. त्याची दखल शनिभक्त व शनैश्वर संस्थान घेत असल्याचे पाहून आनंद मिळतो. आताचे शनिशिंगणापूर खूप बदलले आहे. 

पानसनाला सुशोभिकरणाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. त्याचा मला आनंद व अभिमान आहे, मी प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमास येईल ,असे पडीत जसराज यांनी कबूल केले होते. अशी आठवण बानकर यांनी सांगितली.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com