esakal | पंकजा मुंडे समर्थक म्हणताहेत ही तर टरबुज्या भाजप...बघा व्हिडिअो
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde supporters angry over Fadnavis

विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या एका गटाने मुंडे यांच्या पराभवासाठी धनंजय मुंडे यांना रसद पुरविली आणि पंकजा मुंडे यांचा पराभव घडवून आणला, असा त्यांचा पक्षातील एका गटावर आरोप आहे.

पंकजा मुंडे समर्थक म्हणताहेत ही तर टरबुज्या भाजप...बघा व्हिडिअो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी ः पंकजा मुंडे यांना तिकिट डावलल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट पक्षाच्या महाराष्ट्रातील अध्यक्षांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांना कोणीही ओळखत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली नसल्याने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी टरबूज आणून त्याला सोशल डिस्टन्स पाळत चपलेने बडवले. या टरबुज्यानेच भाजप संपवली. त्याच्या अहंकारामुळेच महाराष्ट्रात सत्ता आली नाही, अशी भाषा त्यांनी व्हिडिओमध्ये वापरली आहे. तो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेला संधी दिली नाही. त्यामुळे संतप्त झालेले पाथर्डी तालुक्यातील मुंडे समर्थक भाजपाला " राम राम " करण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबा व पहा अशी समर्थकांची भूमिका आहे.

कोरोनामध्ये राजकारण नको म्हणून ही मंडळी शांततेत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर मात्र रस्त्यावर उतरुन भाजपाला जाब विचारला जाईल. उत्तर मिळाले नाही तर पक्ष सोडण्याची त्यांनी तयारी चालवली आहे भारतीय जनता पक्षाने माजी ग्रामविकासमंत्री व नेत्या पंकजा मुंडे यांना जाणीवपुर्वक डावलल्याची भावना मुंडे समर्थकांमध्ये आहे. फडणवीस यांच्यावर त्यांनी आरोप लावले आहेत. 

हेही वाचा - हनी ट्रॅप..  म्होरक्या, मास्टरमाईंड, लैला परागंदा

विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या एका गटाने मुंडे यांच्या पराभवासाठी धनंजय मुंडे यांना रसद पुरविली आणि पंकजा मुंडे यांचा पराभव घडवून आणला, असा त्यांचा आरोप आहे. पराभवानंतर राजकीय पुनवसन करण्यात येईल असे सांगितले गेले. मात्र, तसे झाले नाही. मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर कार्य करीत राहणार असल्याचे स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील बड्या नेत्याने मुंडे यांना पुन्हा डावलले. त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध. पाथर्डीतील मुंडे यांचे समर्थक व बीड जिल्ह्याचे युवा मोर्चाचे प्रभारी मुंकुंद गर्जे यांनी तर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्याबाबतचा व्हिडिअो व्हायरल केला आहे. मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग पाथर्डी तालुक्यात आहे.

आई आणि मावशी

परळी माझी आई आणि पाथर्डी माझी मावशी असे स्वर्गीय गोनाथ मुंडे म्हणायचे. त्यामुळे मुंडे परिवारावर प्रेम करणारा इथला मोठा वर्ग आहे. तालुक्यातील मुंडे समर्थक सामूहीक राजीनामे देवुन वेगळी वाट धरण्याची तयारी करीत आहेत. भारतीय जनता पक्षाला राम राम करण्याच्या ते तयारीत आहेत.म्