१०० किलोचे पोते नेहणारी महिला काळाच्या पडद्याआड

शांताराम काळे
Wednesday, 11 November 2020

अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी गुहीरे गावात राहणाऱ्या आदिवासी महिला पार्बता बाई नवले या आदिवासी भागातील गृहिणी अशिक्षित मात्र जिद्दी 1915 रोजी कळसूबाई गडाच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात भारमल कुटुंबात जन्मलेल्या.

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी गुहीरे गावात राहणाऱ्या आदिवासी महिला पार्बता बाई नवले या आदिवासी भागातील गृहिणी अशिक्षित मात्र जिद्दी 1915 रोजी कळसूबाई गडाच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात भारमल कुटुंबात जन्मलेल्या. 

लहानपणापासून कंद, मुळे, झाडपाला याचे औषध गोळा करून परिसरातील रुग्णांना त्या बऱ्या करत. त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या गूहिरे येथे आल्या. त्यावेळी भंडारदरा येथे जलाशयाचे काम सुरू असताना त्यांनी धरणाच्या कामावर जाऊन मजुरी केली. त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बंड केले. आपलं शिक्षण नसले तरी मुलांना शिक्षण दिले. 
नातवंडे देखील अधिकारी बनवले, काबाडकष्ट करून त्यांनी आपले कुटुंब सावरले.

पुरुषाला लाजवील असे त्यांचे काम होते. १०० किलोचे पोते ते डोक्यावर, पाठीवर घेऊन १० किलोमीटर पायी घेऊन जात असे. तर रानात जनावर चरण्यासाठी गेल्या असता वाघाशी झुंज देऊन त्यांनी वाघाच्या तावडीतून गाय सोडवली. अशा या माउलीला पाच मुले, नातवंडे, पणती आहेत. बंड खोर कोंड्या नवले यांच्या बंडाला ताकद देण्याचे व त्याला भाकरी देण्याचे काम आजी करत असे. मुंबई येथे पायी जाऊन राणीच्या बागेत त्या कामाला जात.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbata Navale of Guhire village in Akole taluka passed away