आमच्या मुलांच्या परीक्षेचे काय? पालकांचा प्रश्‍न

मार्तंड बुचुडे
Friday, 30 October 2020

सात महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात व राज्यात शाळा कॉलेज बंद आहेत. गतवर्षी मुलांच्या विविध क्षेत्रातील परीक्षा झाल्याच नाहीत. आता काही परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत.

पारनेर (अहमदनगर) : सात महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात व राज्यात शाळा कॉलेज बंद आहेत. गतवर्षी मुलांच्या विविध क्षेत्रातील परीक्षा झाल्याच नाहीत. आता काही परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत. तर काही नुकत्याच संपल्या असून प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील तसेच इतरही क्षेत्रातील परीक्षांचे काय? असा संमभ्रम विद्यार्थी पालक व शिक्षकांमधे निर्माण झाला आहे. आता पालकांमधून आमच्या मुलांच्या भवितव्याचे काय असाही प्रश्नही उपस्थीत होत आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा लॉकडाऊनपुर्वीच संपल्या होत्या. मात्र त्यानंतर बहुतेक सर्वच परीक्षा रखडल्या होत्या. त्यापैकी फक्त पदवी परीक्षा म्हणजेच फायनल डिग्री परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या अशा विविध विभागाच्या अनेक परीक्षा नुकत्याच ऑनलाईन झाल्या आहेत. तर काही परीक्षा सुरू आहेत. मात्र इतर मुलांच्या परीक्षांचे काय असा प्रश्न पालक व मुलांमधून व्यक्त होत आहे. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील पहिली ते नववी अखेर परीक्षा गतवर्षीही झाल्या नाहीत. आताही प्रथम सत्र संपले तरीही शाळाच सुरू न झाल्याने प्रथम सत्र परीक्षा होणार का असा संमभ्रम तयार झाला आहे. शाळा कधी सुरू होणार व आमच्या मुलांच्या शिक्षणाचे काय असा सवाल अता उपस्थीत होत आहे.

अनेक ठिकाणी शिक्षण ऑनलाईन सुरू आहे असे सांगीतले जात असले तरीही ते किती टक्के सुरू आहे हा मोठा संशोधनाच विषय आहे. तसेच ऑनलाईन किती मुले शिकतात हाही संशोधनाचा प्रश्न आहे. त्यामुळे या पालकांमधून अता आमच्या मुलांच्या भविताव्याचे काय असा प्रश्न विचारला जात आहे.

नुकत्याच ऑनलाईन झालेल्या परीक्षा ह्याही अतीशय जुजबी स्वरूपात झाल्या आहेत. त्यात बहुतेक परीक्षामध्ये होय नाही किंवा पर्याय निवडा या स्वरूपात फक्त संक्षिप्त उत्तरात घेण्यात आल्या. एक तर पदवीच्या परीक्षा म्हणजे त्या मुलास त्या विषयातील बारीक सारीक ज्ञान असावे ही अपेक्षा आहे. मात्र केवळ परीक्षा घ्यावयाचा म्हणून या परीक्षांचा सोपस्कार पुर्ण करण्यात आला आहे.मात्र इतर परीक्षा तशाच राहिल्याने पालकामधून आमच्या मुलांचा काय असे प्रश्न विचारले जात आहेत.

पदीवीच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफ लाईन सुरू आहेत तर काही संपल्या आहेत. काही मुलांनी ऑनलाईन तर काही मुलांनी ऑफलाईन परीक्षा दिल्या आहेत आमच्या कॉलजच्या परीक्षा सुरळीत पार पडत आहेत, असे पारनेर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. आहेर यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents of primary school students are confused about exams