Parner factory : पारनेर कारखाना प्रकरणी गुन्हा दाखल; गुन्ह्यात क्रांती शुगरचे चेअरमन, नऊ संचालक, शिखर बँकेचे अधिकारी
पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीत गैरव्यवहार करणाऱ्या क्रांती शुगर कंपनीचे ९ संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे २ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police have filed a crime report in the Parner factory case, involving Kranti Sugar Chairman, directors, and Shikhar Bank officials.Sakal
पारनेर : पारनेर न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेर पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीत गैरव्यवहार करणाऱ्या क्रांती शुगर कंपनीचे ९ संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे २ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.