

Modus Operandi Busted: Thieves Using Fake UPI Apps to Defraud Fuel Pump Staff Arrested
Sakal
पारनेर : डिझेल भरण्याच्या बहाण्याने पेट्रोल पंपावर जाऊन तेथील कर्मचाऱ्याकडे तुला ऑनलाईन पैसे पाठवतो, मला रोख रक्कम दे अशी मागणी करत , त्याच्या कडून रोख रक्कम घेतल्यावर फेक फोनपे ॲप वापरून पैसे पाठविल्याचे भासवायचे आणि कर्मचाऱ्याच्या लक्षात येण्यापूर्वीच तेथून घाईघाईत पसार व्हायचे. अशा पद्धतीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून एक आरोपी अद्याप फरार आहे त्याचा शोध सुरु आहे.