Drought and water shortages threaten onion crops across Parner taluka.
esakal
पारनेर, : पारनेर तालुक्यात यंदा कांदा उत्पादनावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून आगामी सहा महिन्यांत बाजार समितीतील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. तालुक्यातील बहुतांश भागांतील विहिरी आणि तलावांनी तळ गाठल्याने पाण्याअभावी हजारो एकरांवरील कांदा पीक जळून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यात कांद्याचे उत्पादन घटून बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.